अटी आणि नियम 


मराठी बिझनेस एज्युकेशन मधील माहिती व्हिडिओ, पुस्तके, प्रसार माध्यमे, इंटरनेट, संशोधने आणि आमच्या स्टडीवर आधारित आहे. मराठी बिझनेस एज्युकेशनच्या व्हिडिओमध्ये असलेल्या माहितीची अचूकता, साधनसामग्री, संपूर्णता, कायदेशीरपणा किंवा विश्वासार्हतेसाठी कोणतीही जबाबदारी अंगिकारू शकत नाहीत. व्हिडिओ केवळ व्यावसायिक शिक्षण उद्देशाने तयार केला आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला, कंपनी , सहकारी संस्था, किंवा कुणालाही जखमी किंवा बदनाम करणे किंवा हानी करण्याच्या भावनेने तयार केला गेला नाही. हे व्हिडिओ अफवा पसरवण्यासाठी किंवा कोणत्याही धर्म, समुदाय किंवा व्यक्तींच्या भावना दुखावण्यासाठी किंवा दुखापत करण्यासाठी किंवा कोणत्याही व्यक्तीला (जिवंत किंवा मृत) बदनाम करण्याच्या हेतूने बनवण्यात आलेला नाही. पाहणाऱ्यांनी स्वत: मेहनत घेतले पाहिजेत आणि कोणालाही व्हिडिओमध्ये असलेली आयडिया वापरण्याची इच्छा असेल तर त्याने स्वतःच्या जोखमीवर होणाऱ्या परिणामाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी. व्हिडिओमध्ये असलेली सामग्री कोणत्याही क्षेत्रामधील प्रशिक्षित व्यावसायिकांच्या सेवेस पुनर्स्थित किंवा पर्याय असू शकत नाही तसेच पुढील बाबी जसे कि आर्थिक, वैद्यकीय, कालगर्भीय किंवा कायदेशीर पर्यंतच मर्यादित नाही. मराठी बिझनेस एज्युकेशन आणि निर्माते व्हिडिओच्या आधारे केलेल्या कारवाईमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उद्भवलेल्या कोणत्याही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, अव्यक्त, दंडात्मक, विशेष, अपघाती किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी घेत नाहीत. मराठी बिझनेस एज्युकेशन आणि व्हिडिओ निर्माते कोणत्याही प्रकारची बदनामी, निंदा किंवा कोणत्याही प्रकारचे खोटे आरोप किंवा कोणत्याही प्रकारचे दावे जाहीर करत नाहीत. दर्शकांनी स्वविवेक बुद्धीचा वापर करावा.

व्यवसाय प्रशिक्षण आणि व्यवसाय ईबुक फी साठीचे नियम:


1) मराठी बिझनेस एज्युकेशनकडे कोर्स तसेच ईबुक साठी भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.

2) तुम्ही आमच्याकडे ट्रेनिंग कोर्स व त्यासोबत कोणतीही सर्विस साठी जर पैसे भरलेले असाल तर ते ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.

3) आमचे कोणतेही प्रॉडक्ट खरेदी करताना पेमेंट कन्फर्मेशन झाल्याशिवाय तुम्हाला ते प्रॉडक्ट किंवा ट्रेनिंग खरेदी करता येणार नाही.

4) मराठी बिझनेस एज्युकेशन कडे ज्या सर्विससाठी तुम्ही पैसे भरले आहेत, ते पैसे दुसऱ्या सर्विससाठी हस्तांतर केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

5) रोख स्वरूपात फी स्वीकारल्या जाणार नाही. भरलेल्या फी ची पोहोच पावती (डिजिटल) मेल स्वरूपातच भेटेल याची नोंद घ्यावी.

6) तुम्ही जर कोणत्याही कोर्स किंवा आमच्याकडील कोणत्याही सर्विस साठी पैसे भरले असेल, किंवा भरणार असाल, तर त्या सर्विसचा लाभ एक महिन्याच्या आत (30 दिवस) मध्ये आपल्याला आमच्याकडून घेणे बंधनकारक राहील.

7) जर तुम्ही एखाद्या कोर्ससाठी फी भरली आणि एका महिन्याच्या आत तुम्ही ती कोर्स आमच्याकडून घेतलेच नाही तर ती फी रद्द केली जाईल व कुठल्याही सबबीवर हे फी परत केले जाणार नाही.

ट्रेनिंग कोर्स घेतल्यानंतरचे नियम:


1) कोर्समध्ये सांगितलेल्या किंमती बाजारभावानुसार बदलू शकतात. कोर्समध्ये दिलेल्या किंमती या उदाहरणार्थ म्हणून देण्यात आलेल्या आहेत. यामधील बदल हा गृहीत धरून सध्यस्थितीतील बाजारभाव आणि किंमतीतील बदल हे ग्राहकांनी स्वतःच्या जबाबदारीवर शोधणे बंधनकारक असेल.

2) कोर्सची ऑर्डर पूर्ण केल्यानंतर तो कोर्स ज्या वेळेपासून किंवा ज्या दिवशी त्याची ऑर्डर कंप्लिट केली आहे तेव्हापासून तो पुढील 5 दिवस तुम्हाला बघता येईल. 6व्या दिवशी तो कोर्स एक्सपायर होऊन जाईल.

3) कोर्से बघण्याचा कालावधी हा 5 दिवसांचा देण्यात आलेला आहे. या कालावधीतच हा कोर्से बघून संपवणे आवश्यक आहे. या 5 दिवसांमध्ये आपण काही कारणास्तव कोर्से न पाहू शकल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क करून कळवावे, जेणेकरून कारण लक्षात घेता तात्काळ तो कोर्से थांबवण्यात येईल. दिलेल्या दिवसांमध्ये केव्हा कोर्से चालू करणे आहे हे कळवण्यात यावे. अन्यथा आपली कोर्से न बघितल्याची कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.

4) कोर्से एक्सपायर झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत किंवा कुठल्याही कारणास्तव मुदत वाढ भेटणार नाही. मुदत वाढीसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल याची नोंद घ्यावी.

5) कोर्समध्ये ज्या त्या विषयानुसार काही नोट्स किंवा काही सप्लायर्स कॉन्टॅक्ट नंबर्स अशा अटॅचमेंट दिलेल्या आहेत, त्या आपण स्वतः डाऊनलोड करून घेणे बंधनकारक राहील. स्वतः डाऊनलोड करून न घेतल्यास त्या विषयासंबंधित नोट्स किंवा सप्लायर्स कॉन्टॅक्ट नंबर्स अशा अटॅचमेंट परत दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

6) कोर्स बघताना जर काही अडचण आल्यास किंवा व्हिडीओ दिसत नसल्यास आम्हाला व्हॉट्सऍपवर संदेश पाठवा.

7) मराठी बिझनेस एज्युकेशनच्या कोणताही कोर्स, ई-बुक किंवा वेबसाईटवरील कोणतीही माहिती तसेच त्या कोर्स किंवा ई-बुक मधील कोणतीही माहिती पूर्वपरवानगीशिवाय सोशल मीडियावरती किंवा अन्य माध्यमांद्वारे कॉपी करण्यास, शेअर करण्यास किंवा वापरण्यास सक्त मनाई आहे. असे आढळून आल्यास आपल्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

ई – बुक साठीचे नियम:


1) ई- बुक मधील माहिती हे विविध स्रोतांच्या माध्यमातून आणि व्यक्तिगत अनुभवांवरून संकलित केलेली आहे. कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेने पुढील माहितीचा वापर करताना स्वतःच्या जबाबदारीवर करावा. त्यातून होणाऱ्या परिणामास मराठी बिझनेस एज्युकेशन जबाबदार राहणार नाही.

2) ज्या ठिकाणी किमतीचा संदर्भ देण्यात आला आहे, तो सध्याच्या प्रचलित दरानुसार देण्यात आला आहे. वस्तू, कच्चामाल आणि यंत्रसामग्री यांच्या किमती या बाजार भाव आणि परिस्थितीनुसार कमी-अधिक होऊ शकतात.

3) ई-बुक मध्ये सांगितलेल्या किंमती बाजारभावानुसार बदलू शकतात. ई-बुक मध्ये दिलेल्या किंमती या उदाहरणार्थ म्हणून देण्यात आलेल्या आहेत. यामधील बदल हा गृहीत धरून सध्यस्थितीतील बाजारभाव आणि किंमतीतील बदल हे ग्राहकांनी स्वतःच्या जबाबदारीवर शोधणे बंधनकारक असेल.

4) आपण कोणतेही ई-बुक खरेदी केले असेल तर ते तुम्हाला ई मेलद्वारे किंवा वेबसाईटवरील डाउनलोड सेक्शन मधून पाहता येईल. ई- बुक किंवा त्यातील माहिती इतरांना शेअर करणे दंडनीय गुन्हा समजला जाईल.

5) ई-बुक प्रिंट स्वरूपात दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

6) ई-बुक मधील माहिती व्यतिरिक्त अधिकच्या माहितीची पूर्तता मराठी बिझनेस एज्युकेशन च्या माध्यमातून केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

7) मराठी बिझनेस एज्युकेशनच्या कोणताही कोर्स, ई-बुक किंवा वेबसाईटवरील कोणतीही माहिती तसेच त्या कोर्स किंवा ई-बुक मधील कोणतीही माहिती पूर्वपरवानगीशिवाय सोशल मीडियावरती किंवा अन्य माध्यमांद्वारे कॉपी करण्यास, शेअर करण्यास किंवा वापरण्यास सक्त मनाई आहे. असे आढळून आल्यास आपल्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल

.

**मराठी बिझनेस एज्युकेशनच्या नियमांमध्ये बदल करण्यात येऊ शकतो, तरी आपण वेळोवेळी वेबसाईट च्या नियमांचा आढावा घेत राहावा.**

Shopping Basket
प्रशिक्षण
पुस्तके
अकाऊंट
error: Content is protected !!